कोलकाता : श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट अनिर्णित राहिली आहे. अत्यंत रोमहर्षक अशा या टेस्टमध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत रोमांच पाहायला मिळाला. भारतानं दिलेल्या २३१ रन्सचा पाठलाग करताना श्रीलंकेनं ७ विकेट गमावून ७५ रन्स केल्या होत्या. पण कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर अंधार झाल्यामुळे खेळ थांबवायचा निर्णय अंपायर्सनी घेतला आणि ही टेस्ट ड्रॉ झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये भारत विजयाच्या जवळ पोहोचला असताना विराट कोहलीनं प्रेक्षकांना इशारा केला. भारतीय टीमचा उत्साह वाढवण्यासाठी आणि बॉलर्सना पाठिंबा देण्यासाठी चिअर करा असा इशारा कोहलीनं प्रेक्षकांकडे बघून केला. यानंतर प्रेक्षकांनीही मग जोरदार आरडाओरडा करत भारतीय टीमला चिअर करायला सुरुवात केली.



 


शेवटच्या इनिंगमध्ये भुवनेश्वर कुमारनं ४, मोहम्मद शमीनं २ आणि उमेश यादवनं १ विकेट घेतली. पाचव्या दिवसाची सुरुवात १७१/१ अशी केल्यानंतर भारतानं दुसऱ्या इनिंगमध्ये ३५२/८ वर डाव घोषित केला. विराट कोहलीच्या नाबाद १०४ रन्स, धवनच्या ९४ आणि के.एल.राहुलच्या ७९ रन्समुळे भारतानं श्रीलंकेपुढे २३१ रन्सचं आव्हान ठेवलं.


भारतानं पहिल्या इनिंगमध्ये १७२ रन्स केल्यानंतर श्रीलंकेनं २९४ रन्स करून पहिल्या इनिंगमध्ये महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. पण पावसानं पहिल्या दिवसापासूनच व्यतय आणल्यामुळे ही मॅच अनिर्णित राहिली.