मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गरोदर आहे. अशा परिस्थितीत तिचा नवरा आणि क्रिकेट अनुष्काची पुरेपुर काळजी घेत आहे. अशावेळी दुबईत आयपीएल २०२० टूर्नामेंट सुरू आहे. यावेळी अनुष्का विराटसोबत आहे. अनुष्का कायमच मॅच बघण्यासाठी आणि आरसीबीला चिअर अप करण्यासाठी स्टेडिअमवर पोहोचते. अनुष्का आणि विराटचा स्टेडिअमवरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे दोघं एकमेकांवर इशारा देताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सराव करत असताना विराट अनुष्काला विचारतो, जेवलीस का? याला अनुष्का गोड उत्तर देखील देते. याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. विराट अनुष्काची घेत असलेली काळजी अतिशय चर्चेचा विषय आहे. चाहत्यांना देखील ही गोष्ट खूप छान वाटत आहे. 



दोघांचाही चाहतावर्ग विराटचं कौतुक करत आहेत. अनेकजण त्याला परफेक्ट हसबंड म्हणत आहेत. सामना दरम्यान विराटने अनुष्काची घेतलेली काळजी कौतुकास्पद आहे. विराटनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केलेला एक फोटो पाहता पुन्हा एकदा ही जोडी नेमकी मोस्ट हॅपनिंग सेलिब्रिटी कपल्सच्या यादीत अग्रस्थानी का येते हेच स्षष्ट होत आहे. 


सध्या विराट दुबईमध्ये IPL 2020 आयपीएल 2020 स्पर्धेसाठी गेला आहे. पत्नी अनुष्का हिचीही त्याला साथ मिळत आहे. अशातच आपल्या पत्नीसोबत तो काही खास क्षणही व्यतीत करताना दिसत आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यातील याच काही खास आणि तितक्याच रोमँटीक क्षण क्रिकेटपटू एबी डिविलियर्स यानं त्याच्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. या निमित्तानं विरुष्कासाठी एक अनोखी आठवणही या फोटोच्या रुपात तयार झाली, असं म्हणायला हरकत नाही. 


सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरणांच्या लाल छटांची होणारी उधळण, समुद्राच्या लाटा अंगावर घेणारे विराट- अनुष्का आणि पार्श्वभूमीत असणारी वास्तू असा सुरेख मेळ या फोटोमध्ये साधला गेल्याचं पाहायला मिळत आहे. फार काही कॅप्शन न देता विराटनं हार्ट आणि सुर्यास्त दाखवणारे इमोजी वापरत हा फोटो टीपण्याचं सौजन्य डिविलियर्सला दिलं आहे.