साऊथम्पटन : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ६० रननी पराभव झाला. २४५ रनचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीला ३ धक्के लागले. पण कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतक करून भारताला मॅचमध्ये परत आणण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. विराट कोहलीनं ५८ रनची खेळी केली. याचबरोबर विराटनं काही रेकॉर्डही स्वत:च्या नावावर केली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार असताना विराटनं टेस्टमध्ये ४ हजार रन पूर्ण केले आहेत. विराटआधी कोणत्याही भारतीय कर्णधाराला हे रेकॉर्ड मोडता आला नाही. विराट टेस्टमध्ये सर्वात जलद ४ हजार रन करणारा खेळाडू बनला आहे. विराटनं ६५ इनिंगमध्ये ४ हजार रन पूर्ण केल्या. याआधी ब्रायन लाराच्या नावावर हा रेकॉर्ड होता. लारानं ७१ इनिंगमध्ये ४ हजार रन केले होते. इंग्लंडमध्ये ५०० रन पूर्ण करणारा विराट पहिला आशियाई कर्णधार आहे. इंग्लंडमध्ये ५०० रन करणारा विराट तिसरा भारतीय खेळाडू आहे.


टेस्टच्या चौथ्या इनिंगमध्ये विराटनं आत्तापर्यंत ६ अर्धशतकं केली आहेत. राहुल द्रविडनं चौथ्या इनिंगमध्ये ७ वेळा आणि सुनील गावसकर यांनी ९ वेळा अर्धशतकं केली आहेत.


पहिल्या टेस्टमध्ये विराटनं १४९ आणि ५१ रन, दुसऱ्या टेस्टमध्ये २३ आणि १७ रन, तिसऱ्या टेस्टमध्ये ९७ आणि १०३ रन आणि चौथ्या टेस्टमध्ये ४६ आणि ५८ रन केले. या सीरिजमध्ये विराट कोहलीनं आत्तापर्यंत ५४४ रन केले आहेत.