IND vs NZ: 50 वं शतक ठोकताच Virat Kohli सचिनसमोर नतमस्तक, अनुष्काने दिली फ्लाईंग किस, पाहा `तो` सुवर्णक्षण
Virat Kohli Smash 50th ODI ton : विराट कोहली याने न्यूझीलंडविरूद्ध शतक करत आपल्या 50 शतकाला गवसणी घातली आहे. कोहलीने सचिनचा 49 शतकांचा विक्रम मोडला आहे. शतक ठोकल्यानंतर विराट सचिन तेंडूलकरसमोर नतमस्तक झाला.
IND vs NZ, Virat Kohli : वनडे क्रिकेटचा बादशाह म्हटल्या जाणाऱ्या विराट कोहलीने आजचा दिवस सुवर्णअक्षरात नोंदवला आहे. विराट कोहलीने वानखेडे स्टेडियमवर वनडे क्रिकेटमधील शतकांचं अर्धशतक पूर्ण केलं. 106 बॉलमध्ये विराट कोहली याने शतक ठोकलं अन् क्रिकेटच्या देवाच्या साक्षीने नवा इतिहास रचला आहे. विराट कोहलीने 42 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर दोन धावा घेतल्या अन् शतक पूर्ण केलं. विराटने दोन धावा घेतल्यावर थेट धावता धावता बसला. मान खाली घालून स्वत:शी हसला. त्याच्या चेहऱ्यावर जग जिंकल्याचा आनंद स्पष्टपणे दिसत होता. बॅट खाली टेकवली अन् उभा राहिला. गल्ब काढले अन् हेलमेट खाली उतरवलं. हसत हसत दोन्ही हात वर केले अन् समोर पराक्रम पाहत असलेल्या सचिनला अभिवादन केलं. सचिनने देखील टाळ्या वाजवत विराटच्या कामगिरीचं कौतूक केलं.
सचिनसमोर नतमस्तक झाल्यानंतर विराटने अनुष्काकडे पाहिलं अन् फ्लाईंग किस दिली. त्यानतंर विराटने देखील आपल्या लाईफ पार्टनरसाठी लॉट्स ऑफ लव दिलं. वानखेडे उपस्थित असलेल्या सर्वांनी उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात विराटचं अभिनंदन केलं. हा ऐतिहासिक क्षण अनेकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिल्याचा आनंद देखील प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
पाहा तो क्षण
विराटने २९१ सामन्यांच्या २७९व्या डावात आपले ५० वे शतक पूर्ण केले तर सचिनला ५० शतकांपर्यंत पोहोचण्यासाठी ४५२ डाव लागले. विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. सचिनच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतकांची नोंद होती. आता विराटने आज ५० वे शतक करून सचिनला मागे टाकले आहे.
दरम्यान, क्रिकेट वर्ल्डकप मधील पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर ३९८ धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ४ बाद ३९७ धावांचा डोंगर उभारला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी दमदार शतक ठोकलं. तर केएल राहुल याने वादळी फिशिनिंग केली. त्याचबरोबर शुभमन गिल याने रोहित शर्मासोबत दमदार सुरूवात करून दिली होती.