इंग्लंड : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने इतिहास रचलाय. तो एक एक विक्रम आपल्या नावावर करत आहे. इंग्लंड येथील कसोटी सामन्यात विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडला आहे. सामना सुरु होण्याआधी विराटला सचिनचा विक्रम मोडण्यासाठी केवळ ६ धावांची गरज होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीला कसोटीमध्ये सहा हजार धावांचा टप्पा पार केलाय. कोहलीने आतापर्यंत ११९ डावांत ६००० धावांचा टप्पा पूर्ण केला. सचिनने १२० डावांत सहा हजार धावा केल्या होत्या. त्यामुळे धावा काढण्याच्या बाबतीत विराट सचिनच्या सरस ठरलाय. आज विराट कोहलीने चौथ्या कसोटीत सहा धावा काढत सचिनचा विक्रम मोडला.  


दरम्यान, सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत विराट कोहलीने सहा डावांत ४४० धावा केल्या आहेत. या मालिकेत विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. आतापर्यंत विराट कोहलीने ६९ कसोटी सामन्यातील ११८ डावांत फलंदाजी करताना २३ शतकांसह ५९९४ धावा केल्या आहेत. यादरम्यान विराट कोहलीची सरासरी ५५ आहे. कसोटी त्याची २४८ धावांची सर्वोत्तम खेळी आहे.