पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून तो जोरदार धावा करत आहे. आता इंग्लंड संघाविरूद्ध दुसर्‍या वनडे सामन्यात त्याने आपल्या खेळीदरम्यान मोठे यश संपादन केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या खेळीदरम्यान एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करताना विराट कोहलीने 10,000 धावा पूर्ण केल्या आहेत. विराट कोहलीपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसर्‍या स्थानावर फलंदाजी करताना इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाने 10,000 धावांचा टप्पा गाठला नव्हता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करताना विराट कोहलीने 10,000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. (Virat complete 10 thousand runs On third place)


विराट कोहलीच्या आधी वनडे क्रिकेटमध्ये तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करुन 10 हजार रन करणारा पहिला फलंदाज रिकी पॉन्टिंग आहे. आता विराट कोहली हा पराक्रम करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे, तर पहिला भारतीय फलंदाज आहे. 


तिसर्‍या क्रमांकावर वनडेमध्ये फलंदाजी करताना रिकी पाँटिंगने एकूण 12,662 धावा केल्या, तर विराट कोहलीने 10,000 धावा पूर्ण करत दुसर्‍या क्रमांकावर आला आहे. याबाबतीत तिसर्‍या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि फलंदाज कुमार संगकारा आहे. त्याने वनडेमध्ये तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करताना 9747   धावा केल्या आहेत.


ODI मध्ये तिसर्‍या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज


रिकी पाँटिंग - 12662 धावा


विराट कोहली - 10000 * धावा


कुमार संगकारा - 9747 धावा