Virat Kohli Creates History : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर अनेक विक्रम आहेत. विराटने त्याच्या कारकीर्दीमध्ये प्रदर्शनाच्या जोरावर मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. वनडेमधील सचिनचा सर्वाधिक शतकांचा मोडण्यापासून विराट काही पाऊलं दूर आहे. विराटने कमी डावात वेगाने धावा केल्या आहेत. त्यासोबतच ऑस्ट्रेलिया (Australia), वेस्ट इंडिज (West Indies), दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि इंग्लंड (England) या बलाढ्य संघाविरूद्ध त्याने शतकी खेळी करत टीम इंडियाला कित्येकदा विजय मिळवून दिला आहे. मॉर्डन क्रिकेटमध्ये कोहलीने छाप पाडली आहे. मात्र एक खदखद होती जी चाहत्यांनाही कायम तीसुद्धा आता पूर्ण झाली आहे. (Virat Kohli Creates History As ICC Announces Mens T20I Team Of The Year 2022 latest Marathi Sport News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीने (ICC) पुरुष T20I 'टीम ऑफ द ईयर' जाहीर केली आहे. या संघात 3 भारतीय खेळाडूंचा समावेश असून यामध्ये विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि सुर्यकुमार यादव या तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. विराट कोहलीने याआधी आयसीसीच्या वनडे आणि कसोटी संघामध्ये स्थान मिळवलं होतं. मात्र टी-20 संघात त्याचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 


विराट कोहलीने या यादीमध्ये स्थान मिळवत इतिहास रचला आहे. एकाच वर्षातील आयसीसीच्या कसोटी, एकदिवसीय आणि T20 संघांमध्ये जागा मिळवणारा कोहली पहिला खेळाडू ठरला आहे. कोहलीने तीनवेळा (2017, 2018 आणि 2019) कसोटी संघामध्ये तर वनडेमध्ये सहा वेळा (2012, 2014, 2016, 2017, 2018, 2019) आणि टी-20 मध्ये आता जाहीर झालेल्या यादीमध्ये स्थान मिळवलं आहे. 


ICC Men's T20I Team of the Year 2022:
जॉस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), मोहम्मद रिझवान, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ग्लेन फिलिप्स, सिकंदर रझा, हार्दिक पांड्या, सॅम कुरन, वानिंदू हसरंगा, हरिस राऊफ, जोश लिटल