T20 world cup 2022 : टी-20 विश्वचषक 2022ची (T20 world cup 2022) सुरुवात झाली असून आतापर्यंत चार संघांनी सामने खेळले आहेत. मात्र, सुपर 12 मध्ये समाविष्ट संघांचे सामने पुढच्या आठवड्यापासून सुरू होणार आहेत. भारतीय संघाने (Team India) सोमवारी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (Australia) 6 धावांनी पराभव केला. या सामन्यापूर्वी भारतीय संघ ( india vs australia) रविवारी गाबा (Gaba) येथे प्रॅक्टिस (practice match) करत होता. या सामन्या आधी विराट कोहली (Virat Kohli) मस्तीच्या मूडमध्ये दिसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रॅक्टिस (practice match) दरम्यान विराट कोहली (Virat Kohli) डान्स करताना दिसला. यावेळी त्याच्यासोबत केएल राहुल (KL Rahul), भुवनेश्वर कुमार (bhuvneshwar kumar) आणि अर्शदीप सिंग (arshdeep singh) होते. विराटला नाचताना पाहून त्याच्या शेजारी बसलेले खेळाडूही हसले. विराटच्या डान्सचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात विराट त्याच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे चर्चेत आहे. त्याने फलंदाजीत 13 चेंडूंचा सामना करत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 19 धावा केल्या. यानंतर क्षेत्ररक्षणादरम्यान विराट चित्त्यासारखा चपळ दिसत होता. त्याने आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने एकदा नव्हे तर दोनदा ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चकित केले. शेवटच्या दोन षटकांमध्ये विराटने ही दमदार कामगिरी करत सामना भारताच्या बाजूने वळवला.



दरम्यान, पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव करून भारताने टी-20 विश्वचषक स्पर्धेची मजबूत तयारी केली आहे. फलंदाजीत केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके झळकावतानाच मोहम्मद शमीने अखेरच्या षटकात भारताला विजय मिळवून दिला.