कोलंबो :  राहुल द्रविडने टेस्टमधून निवृत्ती घेतल्यानंतर निवड समितीसमोर सर्वात अवघड काम होते, त्याच्या जागी अशा खेळाडूला निवडायचे की तो त्याची उणीव भासू देणार नाही. निवड समितीने चेतेश्वर पुजारा याची निवड केली. धोनीनंतर आता विराटच्या नेतृत्त्वाखाली पुजाराने चांगली कामगिरी केली. विराट पुजाराच्या कामगिरीशी खूश आहे, त्याला द बेस्ट टेस्ट बॅट्समन घोषीत केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाच्या या फलंदाजाने आपल्या तांत्रिक कौशल्याने धावांचा डोंगर उभारला आहे. श्रीलंका दौऱ्यात पुजाराने दुसरी टेस्टच्या रुपाने आपली ५० वी कसोटी खेळली.  भारताकडून सर्वात जलद ४ हजार धावा बनविणाऱ्या खेळाडूत चौथ्या स्थानावर जाऊन बसला. 


तो आता भारतीय संघाची आधुनिक दिवार बनला आहे. 


कोहली म्हणाला, पुजारा आणि अजिंक्य आमचे दोन सर्वश्रेष्ठ टेस्ट फलंदाज आहे. विशेषतः मधल्या फळीत ते चांगली कामगिरी करतात. ते सतत चांगली कामगिरी करत आहे. पुजारा मी जास्त श्रेय देणार कारण तो टेस्टमध्येच खेळतो आणि धावांची भूक असणे, आपल्या खेळासाठी मेहनत करणे, त्यात चांगली कामगिरी करणे त्याला खूप मानसिक मजबूती देते.  तो खेळाडू म्हणून मानसिक दृष्टा खूप मजबूत आहे. त्याला माहिती की कशा धावा काढायच्या. ही खूप मोठी गोष्ट आहे. क्रिकेटर म्हणून तो खूप परिपक्व आहे.