नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या खोऱ्यानं धावा काढतोय. प्रत्येकवेळी मैदानात येणारा विराट आपल्या नावावर एखाद रेकॉर्ड करुनच परततो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीच्या मैदानावर सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी कोहलीने शानदार डबल सेंच्युरी लगावलीये. विराटची कसोटी कारकिर्दीतील ही सहावी डबल सेंच्युरी आहे.तसेच ही त्याची सलग दुसरी डबल सेंच्युरी आहे. याआधी नागपूरमधील सामन्यात विराटने डबल सेंच्युरी ठोकली होती. 


भारताकडून आतापर्यंत सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी सहा डबल सेंच्युरी झळकावल्या होत्या. त्यानंतर आता या यादीत विराटचे नाव सामील झालेय.


कोहलीने  चेंडूत डबल सेंच्युरी झळकावली. विराटच्या डबल सेंच्युरीमुळे भारताने मजबूत स्थिती गाठलीये. भारताने ४ फलंदाज गमावताना साडेचारशे धावांचा टप्पा गाठलाय.


कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड


या डबल सेंच्युरीसह कोहलीने वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. कर्णधार म्हणून विराट कोहलीने सर्वाधिक डबल सेंच्युरी झळकावण्याचा मान पटकावलाय. कॅप्टन म्हणून विराटनं ६ डबल सेंच्युरी केल्या आहेत तर लाराच्या नावावर ५ डबल सेंच्युरी आहेत. कर्णधार असताना ब्रॅडमन, मायकल क्लार्क आणि ग्रॅम स्मिथ यांनी ४ डबल सेंच्युरी झळकावल्या होत्या.