विराटचा या जाहिराती करण्यास नकार
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आपण चुकीचे संदेश देणाऱ्या कोणत्याही जाहिराती करणार नसल्याचे म्हटले आहे. फेअरनेस क्रीम, पेप्सी आदींच्या जाहिराती करण्यास स्पष्ट नकार दिलाय.
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आपण चुकीचे संदेश देणाऱ्या कोणत्याही जाहिराती करणार नसल्याचे म्हटले आहे. फेअरनेस क्रीम, पेप्सी आदींच्या जाहिराती करण्यास स्पष्ट नकार दिलाय. आरोग्याला हानीकारक आणि वर्णद्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करणार नसल्याचे विराटने स्पष्ट केलेय.
विराटने पेप्सी तसेच सौंदर्य उजळवणाऱ्या क्रिम उत्पादनाची जाहिरात करण्यासही नकार दर्शवलाय. विराट सध्या ऑडी कार, एमआरएफ, प्युमा, बूस्ट, कोलगेट आणि विक्स या उत्पादनाची जाहिरात करीत आहे.
दरम्यान, पेप्सिको आणि विराट कोहली यांच्यात सहा वर्षापासून जाहिरातीसंबंधीचा करार झाला होता. हा करार ३० एप्रिलला संपला आहे. त्यानंतर कंपनी विराटसोबत पुन्हा करार करण्यास उत्सुक होती. परंतु विराटने करार करण्यास नकार दिलाय.
विराट सांगतो, जर मी पेप्सी पित नसेल तर मी इतरांना पेप्सी प्यायला का सांगू?,आरोग्यासाठी हानिकारक कोल्ड्रिंक्स आणि वर्णद्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या फेअरनेस क्रीमच्या जाहिराती यापुढे करणार नाही, असे विराटने स्पष्ट केलेय.