मुंबई : मैदानावर धावांचा डोंगर उभारणारा विराट कोहली कमाईच्या बाबतीत देखील मागे नाही. विराट कोहलीने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडत जगभरात आपला ठसा उमटवला आहे. पण हाच विराट कोहली क्रिकेट शिवाय इतर माध्यमातून देखील कोटींची कमाई करतो.


विराटची 2018 मधील कमाई


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोर्ब्सच्या माहितीनुसार विराट कोहलीने 2018 मध्ये 161 कोटींची कमाई केली आहे. ज्यामध्ये 27 कोटी त्याने पगार आणि बक्षीसांच्या माध्यमातून कमावले आहेत. तर 134 कोटी जाहीरातींच्या माध्यमातून कमवले आहेत. विराट इतकी मोठी कमाई करणार एकमेव भारतीय आणि क्रिकेटर आहे. प्यूमा, पेप्सी, ऑडी आणि ओकले सारख्या कंपन्यांचा तो ब्रंड अॅम्बेसेडर आहे.


इंस्टाग्रामवरुन 84 लाखांची कमाई


एका रिपोर्टनुसार इंस्टाग्रामवर एका प्रमोशनल पोस्टसाठी विराटला 1.20 लाख डॉलर म्हणजेच 82 लाख रुपये मिळतात. विराट इन्स्टाग्रामच्या माध्यमातून देखील मोठी कमाई करतो.


किती मिळते मॅच फी


विराट कोहली भारतीय क्रिकेट टीममध्ये A+ कॅटेगरीमध्ये येणार खेळाडू आहे. त्याला वर्षभरात 7 कोटी रुपये मिळतात. याशिवाय त्याला मिळणारी प्राइज मनी, आयपीएल सारख्या टुर्नामेंटमधून देखील वेगळी कमाई होते. रोहित शर्मा देखील याच कॅटेगरीमध्ये येतो.


लग्नानंतर संपत्तीत वाढ


बॉलिवूड अभिनेत्री अनुष्‍का शर्मासोबत विवाह केल्यानंतर त्याच्या संपत्तीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. विराटचा नेट वर्थ अनुष्‍कापेक्षा 170 कोटी जास्त आहे. कोहलीचा नेट वर्थ 390 कोटी आहे तर विराट आणि अनुष्काची एकूण संपत्ती 610 कोटी आहे. अनुष्‍काची एकूण संपत्ती 220 कोटी आहे. अनुष्काच्या नेटवर्थमध्ये पुढच्या वर्षी 30 टक्क्याने वाढ होण्याची शक्यता आहे.