मुंबई : उत्तम खेळाडूंमध्ये टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू विराट कोहलीचं नाव घेतलं जातं. मात्र 2021 हे वर्ष विराटसाठी काही चांगलं ठरलं नाही. सेंच्युरियनमध्ये सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये कोहली अपयशी ठरला. कोहलीला पहिल्या डावात 35 रन्स आणि दुसऱ्या डावात फक्त 18 रन्स करता आले. त्यामुळे 2019 पासून सुरू असलेल्या 71व्या शतकाची प्रतीक्षा अजून लांबली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीचा दक्षिण आफ्रिकेतील रेकॉर्ड चांगला आहे, त्यामुळे फॅन्सना अपेक्षा होती की, ते 2019 पासून ज्या शतकाची वाट पाहत होते ते या दौऱ्यावर पूर्ण होईल. मात्र असं होऊ शकलं नाही आणि आता वर्ष संपणार असून या वर्षीही कोहली शकत करू शकणार नाही. 


सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहली चांगली खेळी करणार असं दिसत होतं. मात्र बाहेर जाणाऱ्या बॉलला खेळण्याच्या नादात त्याने विकेट गमावली. दुसऱ्या डावातही असंच घडलं आणि विराट कोहली हळू शॉट्स खेळून बाद झाला. कर्णधार विराट कोहलीकडून अशा शॉर्टची कोणालाच अपेक्षा नव्हती.


संपूर्ण वर्षात 1000 रन्सही झाले नाहीत


एक फलंदाज म्हणून विराट कोहलीसाठी 2021 हे वर्ष किती वाईट गेलं याचा अंदाज त्याच्या या वर्षीच्या तिन्ही फॉरमॅटमधील रन्सवरून लावता येईल. विराट कोहलीने यावर्षी कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 असे एकूण 24 सामने खेळले आहे. ज्यामध्ये 30 डावांमध्ये तो खेळला असून केवळ 964 धावा आल्या आहेत. यादरम्यान विराट कोहलीची सरासरी 37.07 होती, जी त्याच्या कारकिर्दीच्या सरासरीपेक्षा खूपच कमी आहे.


कोहलीने कसोटी क्रिकेटमधील शेवटचं शतक नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध केलं होतं. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये, ऑगस्ट 2019 मध्ये, वेस्ट इंडिजविरुद्ध शतक ठोकलं होतं. विराट कोहलीच्या नावावर आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतकं आहेत, मात्र त्याच्या 71व्या शतकाची प्रतीक्षा दोन वर्षांपासून सुरू आहे.