विराटने पंतप्रधान मोदी, अनुष्का आणि धोनीला दिलं हे चॅलेंज
विराटने दिलं पंतप्रधान मोदींना चॅलेंज
मुंबई : फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय खेळ मंत्री राज्यवर्धन सिंह राठौड मंगळवारी अनोखा प्रयोग केला. त्यांनी सकाळी त्यांच्या कार्यालयातील एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत म्हटलं की, मी पंतप्रधानांना बघतो तेव्हा त्यांच्यापासून प्रेरणा मिळते.'
खेळ मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी अभिनेता हृतिक रोशन, क्रिकेटर विराट कोहली आणि बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल यांना देखील या अभियानशी जुडण्यासाठी चॅलेंज दिलं होतं. विराट कोहलीने त्यांचं हे चॅलेंज पूर्ण केलं. त्याने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला.
विराटने हा व्हिडिओ ट्विट करत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, पत्नी अनुष्का शर्मा आणि एमएस धोनी यांना चॅलेंज केलं आहे.