मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात शतक झळकावणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज रजत पाटीदार सध्या खूप चर्चेत आहे. बुधवारी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने 54 चेंडूत 112 रन्स केले. रजतच्या या खेळीमुळे आरसीबीचा 14 रन्सनी विजय झाला. मात्र आरसीबीच्या ताफ्यात रजतसोबत एक लज्जास्पद घटना घडली. 


Rajat Patidar सोबत घडली अशी घटना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध गुजरात टायटन्सच्या सामन्यानंतरची आहे. या सामन्यात विराटने 73 रन्सची उत्तम खेळी केली होती. विराटच्या या खेळीच्या जोरावर बंगळूरूने विजय मिळवला होता. मात्र या सामन्यानंतर रजतसोबत एक घटना घडली. ज्याचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


गुजरातचा पराभव केल्यानंतर बंगळूरूची टीम आनंद साजरा करत होती. खेळाडूंसोबत कोचिंग स्टाफही एकमेकांना मिठी मारत आणि टाळ्या देत आनंद व्यक्त करत होते. याचदरम्यान रजत पाटीदार देखील इतरांना हाय-फाईव्ह देण्यासाठी हात वरून करून उभा होता. मात्र त्याच्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केलं. यावेळी विराट कोहलीने देखील त्याला हाय फाय द्यायला हात पुढे केला नाही. 



कोणीच हाय फाईव्ह देत नसल्याने रजतने स्वतःच टाळ्या वाजवायला सुरुवात केली. ही संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे. शिवाय हा व्हिडीयोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.