बंगळुरू : दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा ६ विकेटनं विजय झाला. एबी डिव्हिलियर्सच्या धुवादार खेळीमुळे बंगळुरूनं दिल्लीला २ ओव्हर राखूनच हरवलं. एबीनं ३९ बॉलमध्ये ९० रनची खेळी केली. यामध्ये १० फोर आणि ५ सिक्सचा समावेश होता. यंदाच्या मोसमातला बंगळुरूचा हा दुसरा विजय आहे. एबी डिव्हिलियर्सनं यंदाच्या आयपीएलमधला सगळ्यात लांब सिक्स लगावला. डिव्हिलियर्सनं या मॅचमध्ये १०६ मिटर लांब सिक्स लगावला होता. याआधी कोलकात्याच्या आंद्रे रसेलनं १०५ मिटरचा सिक्स मारला होता.


बोल्टचा अफलातून कॅच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये दिल्लीच्या ट्रेन्ट बोल्टनं बंगळुरूचा कॅप्टन विराट कोहलीचा अफलातून कॅच पकडला. यंदाच्याच नाही तर आत्तापर्यंतच्या आयपीएलमधला हा सर्वोत्तम कॅच म्हणावा लागेल. दिल्लीचा हर्षल पटेल मॅचची ११वी ओव्हर टाकत होता. पहिल्या ५ बॉलला १० रन आल्या होत्या. शेवटच्या बॉलवर सिक्स मारण्यासाठी विराटनं बॉल टोलवला पण बाऊंड्रीवर उभ्या असलेल्या बोल्टनं एक जबरदस्त कॅच पकडला.


विराटला दु:ख नाही


बोल्टनं घेतलेल्या या कॅचमुळे मला विकेट गमावल्याचं दु:ख झालं नाही, असं विराट कोहली म्हणाला आहे. बोल्टनं अशाप्रकारे कॅच पकडल्यामुळे मला आनंद झाला. भविष्यामध्ये मी आऊट झालेला हा क्षण बघीन तेव्हा मला वाईट वाटणार नाही, अशी प्रतिक्रिया विराटनं दिली आहे.