मुंबई : दहशतवादाच्या मुद्यावरून भारतानं पाकिस्तानसोबत क्रिकेट सीरीज खेळण्यास नकार दिलेला आहे. परंतु, दीर्घकाळापासून पाकिस्तान आणि भारतात पुन्हा क्रिकेट सीरिज व्हाव्यात, यासाठी पाकिस्तान पिच्छा पुरवतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीमेवरून दहशतवाद संपेपर्यंत भारत आणि पाकिस्तान दरम्यान खेळ रंगणार नसल्याचं भारतानं अनेकदा स्पष्ट केलंय. परंतु, भारताविरुद्ध खेळ व्हावा यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आयसीसीपासून सगळीकडे हात पसरलेत. पण त्यांना काही यात यश मिळालेलं नाही. 


अशा वेळी पाकिस्तानी टीम कोच मिकी ऑर्थर भारताला भडकावून तरी हा डाव साधता येतो का? हे पाहत आहेत. यासाठी त्यांनी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीवर निशाणा साधत त्याला पाकिस्तानी क्रिकेट पटूंसोबत सीरीज खेळण्याचं आव्हान दिलंय. 


'कोहली शानदार खेळाडू आहे परंतु, आमच्या टीमविरुद्ध पाकिस्तानमध्ये सेन्चुरी बनवणं त्याच्यासाठी अतिशय कठिण काम ठरेल... कोहलीला सर्व टीम्सविरुद्ध रन्स बनवताना पाहणं चांगलं वाटतं परंतु, आमच्या बॉलर्सविरुद्ध पाकिस्तानी मैदानावर त्याला रन्स बनवणं अवघड जाईल' असं म्हणत मिकी ऑर्थर यांनी कोहलीला पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यासाठी एकप्रकारे आव्हानचं दिलंय.


ऑर्थर यांच्या या प्रतिक्रियेवर भारतानं किंवा कोहलीनं काहीही उत्तर दिलं नसलं तरी नेटिझन्सकडून मात्र त्यांच्या या आव्हानाची चांगलीच खिल्ली उडवलेली दिसतंय.