नवी दिल्ली :  टीम इंडियाच्या वनडे आणि  टी 20 सेगमेंटमध्ये येत्या काही महिन्यात बदल होऊ शकतात. ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी 20 क्रिकेट विश्वकपनंतर विराट कोहली कर्णधारपद सोडण्याची शक्यता आहे. कोहली भारतीय क्रिकेट टीमचा यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून रोहित शर्मा आणि टीम प्रबंधनशी या मुद्द्यावर चर्चा करीत आहेत. सूत्रांच्या मते तीनही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाच्या दबावामुळे विरोट कोहलीच्या फलंदाजीवर परिणाम होत आहे. तसेच 2022 आणि 2023 दरम्यान भारताला 2 विश्वकप खेळायचे आहेत. त्यासाठी विराटच्या फलंदाजीवर परिणाम झालेला भारतीय टीमला परवडणार नाही.


2018 पासून ते आतापर्यंत विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलिया आणि इग्लंडमध्ये काही ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकल्या. 


सूत्रांच्या मते कोहलीला कळून चुकले आहे की, सर्वच फॉरमॅटमधील कर्णधारपदाच्या जबाबदाऱ्या त्याच्या फलंदाजीवर परिणाम करीत आहेत. त्याला स्पेस आणि फ्रेशनेशची गरज आहे. अजुनही टीमसाठी मोठी खेळी करण्याची विराटमध्ये क्षमता आहे. रोहित शर्माने वन डे आणि टी 20 साठी कोहलीच्या अनुपस्थितीत कर्णधारपद सांभाळले आहे. कोहली कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणे कायम ठेवू शकतो. त्याचे वय सध्या 32 असून फिटनेस पाहता आणखी 5-6 वर्ष आरामात टॉप क्रिकेट खेळू शकेल.