मुंबई : गेल्या काही दिवसांपासून माजी कर्णधार विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आलेला नाही. गेल्या दोन वर्षांपासून विराटने एकंही शतक झळकावलेलं नाही. तर दुसरीकडे तिन्ही फॉर्मेटमधून त्याचं कर्णधारपदं काढून घेण्यात आलंय. दरम्यान कर्णधारपदं काढून घेतल्याचं अजूनही विराटला वाईट वाटतंय. आयपीएलपूर्वी विराटने एक मोठं विधान केलंय ज्यामधून त्याला झालेलं दुःख दिसून येतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. यानंतर फॅफ डू प्लेसिसकडे कर्णधारपदाची धुरा सोपवल्यानंतर कोहली आरसीबीचा कर्णधार म्हणून नाही तर 2012 नंतर प्रथमच खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहे.


आरसीबीच्या वेबईसाईटवर पोस्ट केलेल्या एका इंटरव्यूमध्ये कोहली म्हणतो, कर्णधारपदानंतर तुम्ही टीममधील एक नेतृत्व सांभाळणारा खेळाडू बनू शकता. याद्वारे तुम्ही टीमला यश मिळवून देऊ शकता आणि ट्रॉफी आणि विजेतेपदे जिंकू शकता. मला टीमसाठी योगदान देण्यात खूप अभिमान वाटेल. 


विराट पुढे म्हणतो, तुम्ही एक व्यक्ती आहात जो टीमचा भाग आहे. मग तुम्ही टीमचे सदस्य आहात. कर्णधार आहात किंवा नाही, तरीही तुम्ही टीमचा भाग आहात.


टीमबाहेर राहिल्यानंतर अनेकांना टीममधील बदल पहायला मिळतो. मात्र मी स्वतःला भाग्यवान समजतो की, जेव्हा मी टीमचा एक भाग आहे आणि तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर टीममध्ये होणारे बदल पाहू शकतो, असंही कोहलीने सांगितलंय.


जवळपास एका दशकानंतर विराट कोहली कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाला. यानंतर कोहलीने खुलासा केला आहे आणि आता पुन्हा विचार करण्याची संधी ही आहे.