Virat Kohli Miss Century : आयसीसी विश्वचषक 2023 मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे खेळला गेला. भारताने विजयासाठी 200 धावांचे लक्ष्य 4 गडी गमावून पूर्ण केले. विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी शानदार खेळी करत भारताला विजयाकडे नेले. विराटने 85 धावांची तर राहुलने 97 धावांची खेळी खेळली. तर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने तीन महत्त्वाचे गडी टिपले होते. टीम इंडियाने (Team India) पहिल्या सामन्यात झुंजार कामगिरी केली अन् पहिला विजय खिशात घातला आहे. या सामन्यात दोन्ही खेळाडूंना शतक पूर्ण करता आलं नाही. विराट कोहलीने खऱ्या अर्थाने वाघासारखी खेळी केली, पण त्याची सेच्युरी हुकली. त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये (Virat Kohli Viral Video) गेल्यावर कोहलीला संताप अनावर झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताला विजयासाठी 33 धावांची गरज होती, त्यावेळी हेझलवूडने विराटची शिकार केली. एका बाऊंसरवर पूल शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना विराटने सोपा कॅप फिल्डरच्या हातात दिला. त्यामुळे विजयाच्या उंभरठ्यावर पोहोचवून विराट तंबूत परतला. चेपॉकच्या प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्या वाजवत विराटचं अभिनंदन केलं. मात्र, शतक हुकल्याची नाराजी विराटच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्याचबरोबर त्याला शेवटपर्यंत मैदानात टिकता आलं नाही, याचं देखील दु:ख होतं. ड्रेसिंग रुममध्ये गेल्यावर विराटच्या विकेटचा क्षण दाखवण्यात आला, तेव्हा विराटला संताप अनावर झाला. त्याने डोक्यावर हात आपटले. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


पाहा Video



टीम ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.


टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.