कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या वनडेत भारताचा कर्णधार विराट कोहलीनं खणखणीत शतक झळकावलेय. या शतकासह कोहलीने वनडेत ३० शतके पूर्ण केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीनं शतकांमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर रिकी पाँटिंगच्या विक्रमाशी बरोबरी केलीये. रिकी पाँटिंगच्या नावावर वनडेत ३० शतके होती. 


या यादीत सचिन तेंडुलकर ४९ शतकांसह पहिल्या स्थानी आहे. सचिन तेंडुलकरनं ४५२ इनिंग्समध्ये ४९, रिकी पाँटिंगनं ३६५ इनिंगमध्ये ३० तर विराटनं फक्त १८६ इनिंगमध्येच ३० शतकं पूर्ण केली आहेत.