Virat Kohli: इंग्लंड विरुद्ध भारत तीन टी 20 सामन्याची मालिका आजपासून सुरु होत आहे. येणाऱ्या टी 20 विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून ही मालिका महत्त्वाची आहे. या मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडुंवर बीसीसीआयच्या निवड समितीची नजर असणार आहे. विराट कोहलीच्या कामगिरीवरही लक्ष असणार आहे. विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून चांगली कामगिरी करू शकलेला नाही. नोव्हेंबर 2019 पासून वारंवार संधी मिळूनही विराट कोहलीने शतकी खेळी केलेली नाही. तसेच आयपीएल 2022 मध्येही विराट कोहलीच्या बॅटमधून धावा आल्या नाहीत. उलट तीन सामन्यात त्याला भोपळाही फोडता आला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातही विराट कोहली फ्लॉप ठरला. पहिल्या डावात विराटने 19 चेंडुत 11 धावा केल्या आणि मॅथ्यू पॉट्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावातही 20 धावा करून तंबूत परतला. बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर जो रूटने त्याचा झेल घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टी 20 संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ सकते. विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेत अपेक्षित कामगिरी केली नाही, तर त्याला टी 20 संघातून वगळलं जाऊ शकतं. 


विराट कोहली आतापर्यंत 97 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळला आहे. विराट कोहलीने 30 अर्धशतकांच्या जोरावर 3296 धावा केल्या आहेत.