मुंबई : आयपीएल ही सगळ्यात मोठी लीग या लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांना टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळते. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या जागेवरच कुऱ्हाड पडणार का? असा प्रश्न एकूण परिस्थिती पाहता उपस्थित होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दीड वर्षात आणि आयपीएलमध्येही विराट कोहलीचा फ्लॉप शो सतत सुरू आहे. त्याची एकूण कामगिरी पाहता त्याच्या बॅटमधून काही केल्या धावा निघत नाहीत. त्यामुळे त्याला टीममधून बाहेर बसवणार की ब्रेक देणार? याकडे सर्वांच्या नजरा आहेत. 


विराटला गेल्या 100 सामन्यांमध्ये एकही शतक लगावता आलेलं नाही. विराटच्या या 100 सामन्यांमध्ये 17 कसोटी, 21 वनडे, 25 टी 20 आणि 37 आयपीएल मॅचचा समावेश आहे. मात्र विराटची शतकाची प्रतिक्षा अजूनही कायम आहे. 


याच दरम्यान एक मोठी चर्चा सुरू आहे. टी 20 वर्ल्ड कपमधून विराट कोहली आऊट होण्याची शक्यता आहे.  टीम इंडियाकडे आता उत्तम फॉर्ममध्ये खेळणारे खेळाडू आहेत. विराट कोहलीला सध्या श्रेयस अय्यर उत्तम पर्याय आहे. अय्यर खूप चांगली फॉर्ममध्ये आहे. 


टीम इंडियाकडे सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि आता दिनेश कार्तिकही चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. त्यामुळे तोही पर्याय उपलब्ध आहे. शिवाय हार्दिक पांड्या फॉर्ममध्ये आल्याने तो टीममध्ये पुन्हा खेळणार का? की रोहित शर्मा नव्या खेळाडूंना संधी देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठऱणार आहे. 


आयपीएल सामने संपल्यानंतर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरिज खेळायची आहे. यासाठी निवड समिती कोणाची निवड करते याकडे सर्वांच्या नजरा असणार आहे. शिवाय विराट कोहलीला ब्रेक देऊन टी 20 वर्ल्ड कपमधून त्याला पत्ता खरंच कट होणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.