मेगा ऑक्शन सुरु असताना विराट कोहलीचा मेसेज आला की....; हर्षल पटेलचा मोठा खुलासा
मेगा ऑक्शनमध्ये त्याला आरसीबीने घेतलं आणि तोच त्याच्या कारकीर्दीचा टर्निंग पॉईंट ठरला.
मुंबई : रॉयल चॅलंजर बंगळूरूचा गोलंदाज हर्षल पटेल सध्या चांगलाच चर्चेत आहे. 15 सामन्यांत 17 विकेट घेत त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे. 2020 मध्येही तो आयपीएलचा भाग असून त्यावेळी तो दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात होता. मात्र मेगा ऑक्शनमध्ये त्याला आरसीबीने घेतलं आणि तोच त्याच्या कारकीर्दीचा टर्निंग पॉईंट ठरला.
दरम्यान नुकत्याच झालेल्या एका इंटरव्यूमध्ये हर्षलने एक मोठा खुलासा केला आहे. आयपीएलच्या 2022 च्या मेगा ऑक्शनच्या वेळेस एक क्षण असा होता ज्यावेळी हर्षल फार इमोशनल झाला होता.
हर्षल म्हणाला, मेगा ऑक्शनमध्ये आरसीबीचे प्रमुख प्रथमेश मिश्रा यांनी ज्यावेळी माझ्यासाठी पॅडल उचललं होतं त्यावेळी मी फारच इमोशनल झालो होतो.
ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्सच्या शोमध्ये हर्षल म्हणाला, ज्यावेळी माझ्या नावाची घोषणा झाली तेव्हा पहिल्या सेंकदाला आरसीबीचे प्रमुख प्रथमेश मिश्रांनी पॅडल उचललं आणि त्यानंतर विजेच्या वेगाने सर्व गोष्टी घडू लागल्या. हे 6-7 कोटींच्याही पुढे जात होतं. त्यावेळी मला माझ्या पत्नीने सांगितलं की, किंमत डबल होणार. त्यावेळी मी ही तिला 7 कोटींच्या वरील सर्व तुझं होईल असं सांगितलं.
ज्यावेळी ऑक्शन सुरु होतं त्यावेळी मी रूममध्ये होतो आणि त्याचवेळी मला मोबाईल वाजला. मला विराट कोहलीचा मेसेज आला आणि त्याने मला शुभेच्छा दिल्या. अभिनंदन, तुला लॉटरी लागली आहे, असा त्याच्या मेसेज होता.