विजयानंतर विराट कोहलीने नागीन डान्स करून बांगलादेशला डिवचलं? IND vs BAN मॅच दरम्यानचा Video Viral
IND VS BAN 1st Test Virat Kohli Did Nagin Dance To Mock Bangladesh : भारताच्या विजयानंतर स्टार क्रिकेटर विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट मैदानात नागीन डान्स करताना दिसतोय.
IND VS BAN 1st Test Virat Kohli Nagin Dance Video: चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात टेस्ट सिरीजचा पहिला सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशवर 280 धावांनी विजय मिळवून सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. भारताच्या विजयानंतर स्टार क्रिकेटर विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट मैदानात नागीन डान्स करताना दिसतोय.
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार असून यातील पहिला सामना चेन्नईत पार पडला. तर दुसरा सामना हा 27 सप्टेंबर रोजी कानपुर येथे होणार आहे. चेन्नईत झालेल्या सामन्यावर सुरुवातीपासूनच टीम इंडियाची मजबूत पकड होती. टीम इंडियाने चेन्नई येथील सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजी करून बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचे आव्हान दिले. परंतु टीम इंडियाच्या गोलंदाजी समोर बांगलादेश हे आव्हान पूर्ण करू शकली नाही आणि त्यांचा पराभव झाला.
विराट कोहलीचा नागीन डान्स :
बांगलादेश विरुद्ध पहिल्या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली चांगली कामगिरी करू शकला नाही. विराट कोहलीने फलंदाजी करताना पहिल्या इनिंगमध्ये 6 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 17 धावांची कामगिरी केली. तर त्याने सिराजने टाकलेल्या बॉलवर बांग्लादेशच्या फलंदाजाचा एक कॅच पकडला. विराट स्वतः या सामन्यात समाधानकारक कामगिरी करू शकला नसला तरी टीम इंडियाच्या इतर फलंदाज आणि गोलंदाजांची कामगिरी पासून तो खुश असल्याचे दृश्यांमधून अनेकदा समोर आले. सध्या विराटचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात तो मैदानात नागीन डान्स करताना दिसतोय. यावरून अनेकांनी विराट हा बांगलादेशच्या खेळाडूंना नागीण डान्स करून चिडवत असल्याचा दावा केलाय. मात्र याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आली नाही.
पाहा व्हिडीओ :
विराटने बांग्लादेशच्या खेळाडूंची घेतली फिरकी :
दुसऱ्या इनिंगमध्ये विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मात्र तो 37 बॉलमध्ये 17 धावा करून बाद झाला. यादरम्यान कोहलीने बांगलादेशी गोलंदाजाची मजेशीर विनोद केला. शाकिब अल हसन कोहलीच्या जवळ उभा होता. विराट म्हणाला, 'हा मलिंगा आहे, यॉर्करनंतर यॉर्कर टाकतो.' हे ऐकून शाकिबला हसू आवरता आले नाही. विराटचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.