मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड झालेल्या तिन्ही अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतील तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. नुकत्यात झालेल्या वन डे सीरिजमध्ये 2-1ने विजय मिळवला आहे. यासोबत कर्णधार विराट कोहलीनं धावांचा नाही तर आणखी एक आगळा वेगळा विक्रम आपल्या नावावर करून घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि इंग्लंड यांच्यात मालिकेच्या शेवटच्या वन डे सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने एक नवीन विक्रम आपल्या नावावर करून घेतला आहे. यासह तो माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्यानंतर विराट कोहलीचं नाव घेतलं जात आहे. 


विराट कोहली हा भारतासाठी 200 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तिसरा कर्णधार ठरला आहे. जानेवारी 2017 मध्ये विराटला तिन्ही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर टीम इंडियाचा कर्णधारपद सोपविण्यात आलं होतं. रविवारी इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात कोहलीने तिसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळवलं आहे. 


विराट कोहलीच्या आधी MS धोनीचा क्रमांक आहे. दुसऱ्या स्थानावर मोहम्मद अजहरुद्दीनने भारतीय संघासाठी 200हून अधिक सामन्यांचे कर्णधारपद भूषवले होते. त्यानंतर आता या यादीमध्ये विराट कोहलीच्या नावाचा समावेश झाला आहे. अजहरने 221 तर धोनीने 332 सामन्यांमध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून भूमिका निभावली होती.