Virat Kohli Flop Show: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा सध्या पडता काळ सुरु आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो सतत फ्लॉप होत आहे. एकेकाळी शतकी खेळी करणारा हा फलंदाज आता धावांसाठी तळमळत असल्याचं दिसत आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यातही चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र पुन्हा एकदा पदरी निराशा पडली.  भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीत विराट कोहलीची बॅट तळपली नाही. या सामन्यात पहिल्या डावात विराटने 11 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात 20 धावा करून तो तंबूत परतला. आता विराट कोहलीने शेवटचे शतक 955 दिवसांपूर्वी केलं आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटच्या बॅटने गेल्या अडीच वर्षांपासून एकही शतक झळकावलेले नाही. विराट कोहलीचे शेवटचे शतक 22 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेशविरुद्ध होते. ही डे-नाईट कसोटी होती ज्यात त्याने 136 धावा केल्या. या सामन्यानंतर विराटने 64 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 24 अर्धशतकांसह 2509 धावा केल्या आहेत. मात्र एकही शतक झळकावलेले नाही.


64 सामन्यांमध्ये विराटची कामगिरी 


विराट कोहलीने त्याच्या शेवटच्या शतकानंतर एकूण 10 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 872 धावा केल्या आहेत आणि सहावेळा 50 चा टप्पा ओलांडला आहे. तर 21 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10 अर्धशतकांसह 791 धावा आणि 25 टी20 मध्ये 846 धावा केल्या आहेत.