विराट कोहलीच्या नावे नकोसा रेकॉर्ड
विराट कोहलीच्या नाव असाही एक रेकॉर्ड
इंदूर : भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट सामन्य़ामध्ये भारतीय बॉलर्स कमाल केली असली तरी बांगलादेशच्या बॉलर्सने ही चांगली कामगिरी केली आहे. १५० रनवर बांगलादेशच्या टीमला माघारी पाठवण्याऱ्या भारतीय टीमच्या बॅट्समन्सला देखील एका बॉलरने चांगलंच हैराण केलं. अबु जाएदने ३ महत्त्वाचे विकेट घेतले. ज्यामध्ये रोहित शर्मा ६ रनवर, पुजारा ५४ रनवर तर विराट कोहलीला त्याने शुन्यावर माघारी पाठवलं. शुन्यावर आऊट होताच विराटने नकोसा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
विराट कोहलीने एकूण ८३ टेस्ट सामने खेळले आहेत. ज्यामध्ये १० व्या वेळा तो शुन्यावर आऊट झाला आहे. यामुळे विराटच्या नावावर विचित्र रेकॉर्ड बनला आहे.
विराट बांगलादेश विरुद्धच्या इंदूर टेस्टमध्ये शुन्यावर आऊट झाला. मागच्या टेस्ट सामन्यात २०१६ मध्ये त्याने न्यूझीलंडच्या विरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये २११ रन केले होते.
विराट कोहली १० वेळा शुन्यावर आऊट
४ वेळा - गोल्डन डक (पहिल्या बॉलवर आऊट)
४ वेळा - सिल्वर डक (दुसऱ्या बॉलवर आऊट)
१ वेळा - चौथ्या बॉलवर आऊट
१ वेळा - ११ व्या बॉलवर आऊट
भारतातच ३ वेळा शुन्यावर आऊट
विरुद्ध ऑस्ट्रेलिया - पुणे - 2016/17 (मिशेल स्टार्क)
विरुद्ध श्रीलंका- कोलकाता - 2017/18 (सुरंगा लकमल)
विरुद्ध बांग्लादेश- इंदूर - 2019/20 (अबु जाएद)