PSL : विराट कोहलीचे भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. विराट (Virat Kohli) हा क्रिकेटचं प्रतिनिधित्व करतो. भारतात पारंपरिक स्पर्धक असलेल्या पाकिस्तानात देखील विराटची क्रेझ दिसतेय. पाकिस्तान सुपर लीगमध्ये विराटची क्रेझ पाहायला मिळाली. अलीकडेच पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये विराट कोहलीचे पोस्टर झळकले. पाकिस्तानमध्ये खेळत नसतानाही विराटचा दबदबा आहे. त्याच्या पाकिस्तानी चाहत्यांना त्याला पाकिस्तानमध्ये शतक झळकावताना पाहायचे आहे. ( Virat Kohli poster in PSL )


पाकिस्तानमध्ये विराट कोहलीचे पोस्टर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि मुलतान सुलतान यांच्यात शुक्रवारी गद्दाफी स्टेडियमवर सामना सुरू होता. मुलतान सुलतान्सच्या डावाच्या 12व्या षटकात थेट सामन्यादरम्यान कॅमेरा प्रेक्षकांकडे वळला. तिथे एक पाकिस्तानी चाहता विराट कोहलीचे मोठे पोस्टर स्टँडवर लावताना दिसला. पाकिस्तानच्या स्टेडियममध्ये विराट कोहलीचे पोस्टर पाहून पाकिस्तानसह अवघं जग गलबलून गेलं. विराट कोहलीच्या या क्रेझचे दृश्य जगभर व्हायरल होत आहे.


विराट कोहलीच्या या पोस्टरद्वारे चाहते विराटला सांगण्याचा प्रयत्न करत होते की, त्याला माजी भारतीय कर्णधाराला पाकिस्तानमध्ये शतक झळकावताना पाहायचे आहे. पोस्टरमध्ये विराट टीम इंडियाच्या जर्सीमध्ये त्याच्या ब्रँडेड बॅटने शॉट्स खेळताना दिसत आहे. 'विराट कोहली, मला तुला पाकिस्तानमध्ये शतक झळकावताना पाहायचे आहे', असे पोस्टरवर लिहिले आहे. या व्यक्तीने पोस्टरसोबत #Peace देखील लिहिले होते.


शोएब अख्तरचे ट्विट



पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पीएसएल सामन्यादरम्यान विराट कोहलीचे पोस्टर हातात धरलेल्या एका चाहत्याचा फोटो ट्विट केला आहे. मला तुझे शतक पाकिस्तानात पहायचे आहे, असे संदेशात लिहिले आहे.


विराट कोहलीच्या चाहत्यांना त्याला पाकिस्तानात खेळताना पाहायचे आहे. विराटचा पाकिस्तानविरुद्ध उत्कृष्ट रेकॉर्ड असला तरी त्याचे तिथे चाहते आहेत. एकदिवसीय, टी-20 आणि कसोटीमध्ये विराटने पाकिस्तान संघाविरुद्ध 20 सामन्यांमध्ये 56.46 च्या सरासरीने 847 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.