बर्मिंगहम : भारत आणि इंग्लंडमधल्या पहिल्या टेस्ट मॅचला सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर इंग्लंडनं सावध सुरुवात केली. इंग्लंडचा स्कोअर २० रनवर असताना अजिंक्य रहाणेनं इंग्लंडचा बॅट्समन किटन जेनिंग्सचा कॅच सोडला. ईशांत शर्माच्या बॉलिंगवर अजिंक्य रहाणे चौथ्या आणि विराट कोहली तिसऱ्या स्लिपमध्ये उभा होता. पण हा कॅच विराटचा होता का? असा प्रश्न उपस्थित होतोय. विराट कोहलीनंही कॅच सोडल्यानंतर अजिंक्य रहाणेकडे पाहिलं आणि यानंतर अजिंक्य रहाणेची प्रतिक्रियाही खूप काही सांगून गेली. कॅच सुटला तेव्हा जेनिंग्स ९ रनवर खेळत होता. अखेर मोहम्मद शमीनं त्याला ४२ रनवर बोल्ड केलं.


पाहा काय झालं कोहली-रहाणेमध्ये