Virat Kohli Remember MS Dhoni: क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि दिग्गज क्रिकेटर एमएस धोनी (MS Dhoni) यांच्यामध्ये एक वेगळचं नात आहे. कोहली धोनीला आपला आदर्श मानतो. अनेक कठिण प्रसंगात धोनीने विराटला साथ दिल्याने अनेकदा त्याने सांगितले आहे. आता पुन्हा एकदा विराट कोहलीला महेंद्रसिंग धोनीची आठवण आली आहे.धोनीची आठवण काढत कोहलीने एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये धोनीचा फोटो आहे. या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टोरीत काय? 


विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्याने पाण्याच्या बाटलीचा फोटो शेअर केला आहे. या बाटलीवर महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) फोटो असलेला स्टिकर आहे. धोनीचा हा फोटो पाहून कोहलीने त्याच्या स्टोरीवर लिहिले की, "तो (महेंद्रसिंग धोनी) सर्वत्र आहे, अगदी पाण्याच्या बाटलीवरही." या स्टोरीत त्याने धोनीलाही टॅग केले आहे. दरम्यान या स्टोरीची आता सर्वत्र चर्चा आहे. 


हा कोणता फोटो आहे? 


दरम्यान धोनीचा (MS Dhoni) हा फोटो एका जाहिराती संदर्भातला वाटत आहे. तो एका पाण्याच्या ब्रँडची जाहिरात करत असल्याचे फोटोवरून कळत आहे. या फोटोमुळे तो ट्विटरवर देखील ट्रेंड होतोय. सध्या धोनीच्य़ा या फोटोची चर्चा आहे. 



 
...धोनीचा मेसेज आला 


मध्यंतरी कोहली (Virat Kohli) अनेक अडचणीत होता. तो आऊट ऑफ फॉर्म होता, त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) खास चांगला परफॉर्म करत नव्हती. त्यामुळे त्याचे कर्णधारपदही काढून घेण्यात आले होते. अशा सर्व गोष्टीतून जात असताना त्याने धोनी संबंधित एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, “मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो. जेव्हा मी कसोटी कर्णधारपद सोडले तेव्हा मला फक्त एकाच व्यक्तीकडून मेसेज आला. ज्यांच्यासोबत मी यापूर्वी खेळलो आहे, तो महेंद्रसिंग धोनी होता. अनेकांकडे माझा नंबर होता, अशी खंत देखील त्याने यावेळी व्यक्त केली होती.


दरम्यान नुकत्याच झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला (Team India)  सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर क्रिकेट फॅन्सना महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) खूप आठवण आली होती. कारण धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने शेवटच्या वेळी आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली T20 विश्वचषक (2007), एकदिवसीय विश्वचषक (2011) आणि चॅम्पियन ट्रॉफी (2013) जिंकली आहे.