मुंबई : विराट कोहलीच्या बंगलुरूने सोमवारी 14 मे रोजी आयपीएल 2018 मध्ये पंजाबला 10 विकेटांनी शिकस्त दिली. या सामन्याच्या वेळी कॅप्टन विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा नव्हती. म्हणून तिने मेकअप रूममधूनच बंगलुरू टीमवला चीअर अप केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या जीरो या शुटिंगमध्ये व्यस्त होती. त्यामुळे अनुष्का शर्मा आयपीएलमध्ये विराट कोहली आणि त्याच्या बंगलुरू टीमला चिअर अप करायला येऊ शकली नाही. मात्र ती कोहलीला आणि त्याच्या संघाला ऑल द बेस्ट करण्याची संधी सोडत नाही. अनुष्काने सोमवारी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अनुष्काने जो टी शर्ट घातला आहे. त्यावर विराट कोहलीचं नाव लिहिलं आहे. या फोटोला शेअर करताना तिने म्हटलं आहे की, कम ऑन बॉईज 




या फोटोवर विराट कोहलीने देखील उत्तर देऊन सोशल मीडियावर चर्चेला विषय दिला आहे. कोहलीने यावर यस माय लव असं म्हटलं आहे.