विराटचं खणखणीत शतक, भारत मजबूत स्थितीत
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं खणखणीत शतक लगावलं आहे.
केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं खणखणीत शतक लगावलं आहे. विराट कोहलीच्या शतकामुळे भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे. विराट कोहलीचं वनडे कारकिर्दीतलं हे ३४वं शतक आहे.
या सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये विराट कोहलीनं शतक लगावलं होतं. त्यानंतर दुसऱ्या वनडेमध्ये विराट नाबाद राहिला होता. विराटबरोबर धोनी सध्या मैदानात आहे. ३९ ओव्हरनंतर भारताचा स्कोअर २१२ रन्सपर्यंत पोहोचला आहे. शेवटच्या ११ ओव्हरमध्ये फटकेबाजी करून दक्षिण आफ्रिकेला मोठं आव्हान देण्याची संधी विराट-धोनीपुढे आहे.
भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. ६ मॅचच्या या सीरिजमध्ये भारत २-०नं पुढे आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मैदानामध्ये पहिल्यांदाच ३ वनडे मॅच जिंकून आघाडी घ्यायची संधी भारताला आहे. या मॅचमध्ये भारतीय टीममध्ये कोणतेही बदल नाहीत. आम्ही टॉस जिंकलो असतो तरी पहिले बॅटिंगच घेतली असती, अशी प्रतिक्रिया विराट कोहलीनं दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या टीमला मात्र दुखापतीनं ग्रासलं आहे. एबी डिव्हिलियर्स, फॅप डुप्लेसीस आणि क्विटंन डीकॉक दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत. फॅप डुप्लेसिसच्या अनुपस्थितीमध्ये एडन मार्करम दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आहे.
लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा