नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका य़ांच्यातील ३ टेस्ट मॅचमध्ये दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर विराट कोहलीने आणखी एक शतक ठोकलं आहे. मुरली विजयने टी-टाईम आधीच आपलं 11 वां शतक पूर्ण केलं. 163 बॉलमध्ये त्याने शतक ठोकलं. मुरली विजयने शतकीय खेळीत 9 चौकार लगावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने टॉस जिंकत आधी बँटींग करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेविरोधात भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीने २० वं शतक ठोकलं आहे. कोहलीने श्रीलंकेविरोधात या सीरीजमध्ये तिसरं शतक ठोकलं आहे. नागपूरमध्ये कोहलीने दुहेरी शतक ठोकलं होतं. भारत या सिरीजमध्ये १-० ने पुढे आहे.


भारताने दोन विकेट गमावून 250 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सलामीवीर मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहलीची जोडी मैदानावर असून त्यांच्यामध्ये तिस-या विकेटसाठी 160 पेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली आहे. शिखर धवन (23) आणि चेतेश्वर पूजारा (23) धावांवर बाद झाले. परेरा आणि गामागेने प्रत्येकी एक-एक विकेट घेतला.