Sunil Chhetri : विराट कोहलीचे (Virat Kohli) चाहते सध्या फार खूश आहेत. याचं कारण म्हणजे, रॉयल चॅलेंजर बंगळूरूची (Royal Challengers Bangalore) कॅप्टन्सी पुन्हा एकदा विराटने केली आणि सध्या तो उत्तम फॉर्ममध्ये खेळतोय. अशातच किंग कोहलीच्या (King Kohli) चाहत्यांसाठी अजून एक गूड न्यूड आहे. भारतीय फुटबॉल टीमचा (Indian Football Team) किंग सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने देखील विराटच्या आरसीबी (RCB) टीममध्ये प्रवेश केलाय. आरसीबीने एक व्हिडीओ पोस्ट केलाय. ज्यामध्ये विराट छेत्रीच्या नावाची जर्सी त्याला देताना दिसतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरसीबीने पोस्ट केलेला हा व्हिडीओ प्रमोशनल आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली त्याच्या टीममधील खेळाडूंसोबत मस्ती करताना दिसतोय. कोहलीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 


आरसीबी आणि पुमाने एकत्रित केलेल्या या व्हिडीओमध्ये विराट कोहलीच्या डोळ्यावर पट्टी लावण्याच आली आहे. यामध्ये विराटला स्पर्श करून समोरचा खेळाडू कोण आहे, हे ओळखायचं आहे. याला ब्लाईंड फोल्ड चॅलेंज असंही म्हटलं जातं. 


या व्हिडीयोमध्ये विराटच्या कोहलीच्या सर्व प्रथम दिनेश कार्तिक समोर येतो. दिनेशची उंची आणि दाढीवरून विराट त्याला लगेच ओळखतो. त्यानंतर सिराजच्या दाढीवरून विराटला तो तातडीने ओळखू येतो. त्यानेत हातातील घड्याळ आणि टॅटूवरून कर्णधार फाफ असल्यांचंही विराटच्या लक्षात येतं. 


मात्र या तिघानंतर विराटसमोर सुनील छेत्री येतो. सुनील त्याच्या हातात बॉल देतो. यावेळी मात्र विराट काहीसा गोंधळलेला दिसतो. मात्र अखेरीस हिंट दिल्यावर तो लगेच सुनीलला ओळखतो आणि जोरात मिठी मारतो. सुनील आणि विराट दोघंही एकमेंकांचे खूप चांगले मित्र आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by PUMA India (@pumaindia)


विराटने छेत्रीला दिली त्याच्या नावाची जर्सी


या गेमनंतर विराट कोहली सुनीलला खास त्याच्या नावाची जर्सी भेट म्हणून देतो. या जर्सीच्या मागे छेत्री आणि नंबर 11 असं लिहिलेलं आहे. 


विराट कोहली सध्या उत्तम फॉर्ममध्ये


विराट कोहलीचे चाहते सध्या खूश असण्याचं अजून एक कारण म्हणजे, विराट सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विराट खराब फॉर्मशी झुंजत होता. यंदाच्या आयपीएलमध्ये विराटने 6 इनिंगमध्ये 4 अर्धशतकं झळकावली आहेत. तर कोहलीने 142 च्या स्ट्राईक रेटने 279 रन्स देखील केले आहेत.