मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या सिझनपूर्वी रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या कर्णधारपदाची धुरा फाफ ड्यू प्लेसिसकडे देण्यात आली. टीम इंडियाचं कर्णधारपद सोडल्यानंतर विराटने आयपीएलच्या टीमचं कर्णधारपदंही सोडून दिलं. दरम्यान फाफकडे कर्णधारपद दिल्यानंतर कोहली नाराज असल्याची चर्चा झाली होती. अशातच विराट कोहलीने फाफबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटने आयपीएल 2021 च्या शेवटाला रॉयल चॅलेंजर बंगळूरूचं कर्णधारपद सोडून देण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर फ्रेंचायझीने मेगा ऑक्शनमध्ये फाफ डू प्लेसीला खरेदी केलं आणि कर्णधारपदाची धुरा दिली. फाफसोबतच्या मैत्रीबद्दल बोलताना विराट म्हणाला, फाफ आणि माझी नेहमी चांगली मैत्री राहिली आहे. 


विराट पुढे म्हणाला, फाफ एक असा व्यक्ती आहे, ज्याला स्वतःवर विश्वास आहे. शिवाय सामन्यादरम्यान त्याच्याकडे मैदानाचे पूर्ण अधिकार असतात. कधीकधी तो माझं ऐकत नाही. मी अनेकदा त्याला सल्ला देतो मात्र तो त्याला नकार देतो. मात्र त्याच्या या निर्णयाचा मी सन्मान करतो. 


कोहलीच्या खराब फॉर्मवर फाफचं मोठं विधान 


विराट कोहली खूप जास्त मेहनत करत आहे. मात्र तो खराब फॉर्ममधून जात आहे. तो मेहनत करतोय फक्त त्याने पॉझिटिव्ह राहायला हवं. अनेक चांगल्या बाजू कोहलीकडे आहेत. आम्हाला आता पुढच्या सामन्याची तयारी करायची आहे. आमच्यासाठी पुढचा सामना जिंकणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. 


आम्ही जास्त विकेट्स घालवल्या. विराट कोहलीनंतर लागोपाठ विकेट्स पडल्या. जो दबाव होता तो राहिला नाही. एकामागे एक खेळाडू तंबुत परतले. त्यामुळे बंगळुरू टीमचं मनोबल खचल्याचं सांगितलं त्याचा तोटा आम्हाला झाला