Vamika Virat Kohli : सोमवारी बंगळुरू येथे झालेल्या इंडिया प्रीमियर लीग (IPL 2023) च्या 15 व्या सामन्यात लखनऊने आरसीबीचा 1 विकेट्सने पराभव केलाय. या सामन्यात किंग कोहलीचा (Virat Kohli) जलवा पहायला मिळाला. विराटने अफलातून बॅटिंगच्या जोरावर 64 धावा केल्या. फक्त 44 बॉलमध्ये विराटने ही कामगिरी केली. यावेळी 4 भन्नाट फोर आणि 4 गगनचुंबी षटकार खेचत विराटने मैदान मारलं. कोहलीच्या आक्रमक खेळीच्या जोरावर आरसीबीला चांगली साथ मिळाली होती. याच सामन्यात विराटचा रागीट स्वभाव देखील पहायला मिळाला. आपल्या नवऱ्याची कामगिरी पाहण्यासाठी विराट कोहलची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) देखील पोहोचली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची मुलगी (Virat Kohli Daughter) वामिका देखील सामना पाहण्यासाठी आली होती. सामना संपल्यानंतर विराटने थेट लाडक्या लेकीकडे धाव घेतली. विराटने घेतलेल्या कॅचनंतर अनुष्का आनंदाचे टाळ्या वाजवताना दिसली होती. तर आरसीबीच्या पराभवानंतर तिचा हिरमुसलेला चेहरा देखील दिसला होता. अशातच आता विराटच्या लेकीचा फोटो समोर आला आहे.


आणखी वाचा - RCB vs LSG: विराट कोहलीच्या आरसीबीला डबल झटका; मॅच तर हारलीच पण 'या' खेळाडूने केली मोठी चूक!


विराट कोहलीने स्वतःचा आणि मुलगी वामिकाच्या (Vamika Virat Kohli) एका नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. कोहलीने दोघांचा एक गोंडस पूलसाइड फोटो (Vamika Kohli Image) शेअर केला. ज्यामध्ये ते पाण्याजवळ बसलेले दिसत आहेत. त्यांचे चेहरे दिसत मात्र यात दिसत नाहीत. विराटने निळा स्विमवेअर (Swimming Pool) आणि कॅप घातली आहे, तर गोंडस वामिकाने एक्वा ब्लू आणि गुलाबी स्विमसूटमध्ये होती.


पाहा पोस्ट - 



दरम्यान, विराटने सोशल मीडियावर पोस्ट (Virat Kohli Instagram) केलेल्या फोटोमध्ये ते दोघेही एकमेकांच्या शेजारी बसले असताना त्याने वामिकाला जवळ धरलंय. युझर्सने अनेक कमेंट देखील या फोटोवर केल्या आहेत. विराटने रेड हार्ट टाकत फोटो शेअर केलाय. राजा त्याच्या राजकुमारीसोबत, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर तुफान शेअर होत असल्याचं दिसतंय.