बंगळूरू : भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा टेस्ट सामना बंगळूरूच्या मैदानावर खेळला जातोय. या सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निर्णय घेतला. यावेळी सर्वांच लक्ष होतं ते विराट कोहलीच्या खेळीकडे. विराटचे चाहते त्याच्या 71 व्या शतकासाठी आतुर होते. मात्र विराटने त्यांची पुन्हा एकदा निराशा केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेचा पार्ट टाईम स्पिनर धनंजय डि सिल्वाच्या गोलंदाजीवर एलबीडब्लू आऊट झाला. कोहलीने पहिल्या डावात 48 बॉल्समध्ये 23 रन्स केले. मात्र आऊट झाल्यानंतर विराट कोहलीने दिलेलं रिएक्शन आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.


आऊट झाल्यानंतर विराट कोहली थक्क झाला. आणि एकटक पिचकडे बघतच बसला. विराट कोहलीच्या या रिएक्शननंतर बंगळूरू स्टेडिएमच्या या पिचसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले. या पिचवर सामन्याच्या पहिल्याच दिवशी 16 विकेट्स गेले. असं झाल्यास हा सामना अवघ्या तीन दिवसांत संपू शकतो. 


कोहलीच्या शतकाची अजूनही प्रतिक्षा


23 रन्सवर आऊट झालेल्या कोहलीच्या शतकाची त्याच्या चाहत्यांना अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे. विराटने त्याचं शेवटचं शतक 2019मध्ये झळकावलं होतं. त्यावेळी बांग्लादेशविरूद्ध झालेल्या टेस्ट सामन्यात त्याने 136 रन्सची खेळी केली होती. त्यानंतर विराटला आतापर्यंत एकंही शतक झळकवता आलेलं नाही.