मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आता रॉयल चॅलेंजर बंगळूरूकडून आयपीएलमध्ये खेळतो. 2008 पासून विराट कोहली आरसीबीच्या ताफ्यात आहे. आरसीबीने 2008 मध्ये ड्राफ्टद्वारे विराट कोहलीची निवड केली होती. यानंतर दुसऱ्या कोणत्या आयपीएलच्या टीममध्ये विराट कोहली दिसला नाही. दरम्यान यावरूनच आता विराटने एक मोठं विधान केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टार स्पोर्ट्सच्या  इनसाइड आरसीबी शो मध्ये विराटने अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. यावेळी इतर फेंचायझींना मला त्यांच्यासोबत घेण्याची संधी होती, मात्र कोणीही विश्वास दाखवला नसल्याची खंत विराटने बोलून दाखवली. 


विराट कोहली म्हणाला, या फ्रँचायझीने मला गेल्या 3 वर्षांत जे काही दिलंय आणि माझ्यावर विश्वास निर्माण केला ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण अनेक टीम्सना संधी होती. मात्र, त्यांनी मला साथ दिली नाही आणि त्यांनी मला त्यांच्यासोबत घेतलं नाही. त्यांचा माझ्यावर विश्वास नव्हता.


दिल्ली डेअरडेव्हिल्सला (दिल्ली कॅपिटल्स) भारतीय U19 स्टार निवडण्याची पहिली चांगली संधी होती. पण, त्या काळात या फ्रेंचायझीने डावखुरा वेगवान गोलंदाज प्रदीप सांगवानला त्यांच्या ताफ्यात घेतलं. यावेळी त्यांनी विराट कोहलीकडे दुर्लक्ष केलं.


विराट पुढे म्हणतो, मी मेगा ऑक्शनमध्ये यावं आणि माझं नाव पुढे करावं, यासाठी माझ्याशी अनेकदा संपर्क झाला. पण, मी त्याचा विचार केला. मुळात अनेकांची अशी इच्छा आहे की, मी माझं नाव मेगा ऑक्शनमध्ये द्यावं, असंही विराट कोहलीने सांगितलं आहे.