IND vs BAN : बांगलादेशच्या दमदार गोलंदाजीविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा डाव 186 धावांत गुंडाळला. बांगलादेशच्या शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) 5 तर इबादतने 4 बळी घेत भारतीय संघाला गुढघे टेकायला लावले आहेत. भारतीय संघाकडून उपकर्णधार केएल राहुलने (KL Rahul) सर्वाधिक 73 धावांची खेळी केली आहे. भारतीय संघ 50 ओव्हरही खेळू शकला नाही. अवघ्या 41.2 षटकांतच भारताचा डाव आटोपला. रोहित शर्मा आणि शिखर धवन या भारताच्या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 23 धावा काढल्या. मेहदी हसनने शिखर धवनला 7 धावांवर बाद करत माघारी पाठवले. त्यानंतर शाकिबने आधी रोहित शर्मा आणि नंतर विराट कोहलीला (Virat Kohli) केवळ 9 धावांवर बाद केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाकिब अल हसनने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला 11व्या षटकात बाद करत भारतीय संघाला आणखी बॅकफूटवर ढकलले. यादरम्यान बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने कोहलीचा अप्रतिम झेल पकडला, जो पाहून विराट स्वतःही आश्चर्यचकित झाला. 11व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कोहलीला कव्हर्सवर शॉट मारायचा होता, पण चेंडू थांबून आला. त्यामुळे विराटने हा चेंडू खेळल्यानंतर तो हवेत गेला आणि थोडा लांब असलेल्या लिटन दासने ( Litton Das) डायव्ह टाकून एका हाताने शानदार झेल घेतला. हा अप्रतिम झेल पाहून कोहलीही आश्चर्यचकित झाला.



दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा मीरपूर, ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात वेगवान गोलंदाज कुलदीप सेनने पदार्पण केले. तर ऋषभ पंत या मालिकेतून बाहेर पडला. अष्टपैलू अक्षर पटेल पहिल्या वनडेत निवडीसाठी उपलब्ध नव्हता.