T20 World Cup 2022: कॅच घेतला पण...; पाकिस्तानविरूद्ध विराटने दाखवला मनाचा मोठेपणा
अर्शदीप सिंगने टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली.
मेलबर्न : ICC T20 वर्ल्डकपमध्ये अखेर भारताची सुरुवात झाली आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जातोय. टॉस जिंकून टीम इंडियाने पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि त्यानंतर अर्शदीप सिंगने टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली.
कर्णधार बाबर आझम गोल्डन डकवर बाद झाला आणि त्यानंतर मोहम्मद रिझवान अवघे 4 रन्स करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. चौथी ओव्हर टीम इंडियासाठी चांगली झाली. या ओव्हरची सुरुवात शान मसूदच्या चौकाराने झाली. त्यानंतर मसूदने सिंगल रन घेतला आणि रिझवानला स्ट्राइक देतो.
रिझवानने ओव्हरमधील पाचवा खेळला मात्र तो जास्त दूर जाऊ शकला नाही. याठिकाणी विराट कोहलीने फुल लेन्थ डायव्ह करून झेल घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र हा बॉल त्याच्या काहीसा पुढे पडला.
विराटने हा झेल घेतला आहे, असंच सर्वांना वाटत होता. मात्र अंपायरने निर्णय घेण्याआधीच विराटने स्वत: हातावारे करून कॅच नसल्याचं सांगितलं. त्यावेळी रिझवान 11 बॉल्समध्ये 4 रन्सवर खेळत होता. मात्र, रिझवानला या जीवदानाचा फारसा फायदा उचलता आला नाही आणि पुढच्याच बॉलवर तो कॅच आऊट झाला.
टीम इंडियाची खराब सुरुवात
टीम इंडियाची सुरुवात अत्यंत खराब सुरुवात झाली. ओपनर रोहित शर्मा आणि केएल राहुल अवघ्या 4 रन्सवर करुन बाद झाले आहेत. त्यानंतर सूर्यकुमारने काहीसा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र त्यालाही यामध्ये यश मिळालं नाही. तो 15 रन्स करुन आऊट झाला.