पुणे : भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शानदार विजय मिळवत मालिकेत कमबॅक केले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन्सने या सामन्यात टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला खरा मात्र तो त्यांना चांगलाच महागात पडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामना जिंकल्यानंतर कोहलीने टॉस हरण्याबाबत महत्त्वाचे विधान केले. विराट म्हणाला, जेव्हा आम्ही टॉस हरलो आणि न्यूझीलंडने फलंदाजीचा निर्णय़ घेतला तेव्हाच आम्ही जिंकलो होतो. कारण, खेळ जसजसा पुढे सरकेल तसतशी खेळपट्टी धीमी होत जाईल आणि रात्रीच्या वेळेस या खेळपट्टीवर चांगल्या धावा करता येतील हे मला माहीत होते. 


कर्णधार कोहलीने यावेळी गोलंदाजांना विजयाचे श्रेय दिले. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांच्या कामगिरीचेही त्याने कौतुक केले. भुवनेश्वर आणि बुमराह यांनी चांगली कामगिरी केली. त्यांच्या भेदक गोलंदाजीमुळेच न्यूझीलंडला 230 धावांवर रोखता आले. 


भारताकडून फलंदाजीत शिखर धवन आणि दिनशे कार्तिक यांनीही साजेशी कामगिरी केली. शिखर सध्या चांगल्या फॉर्मात आहे. दिनेशनेही चांगली कामगिरी केली. आम्ही कोणत्याही आव्हानासाठी तयार आहोत. आम्ही मालिकेत कमबॅक करु असे म्हणालो होतो आणि ते करुन दाखवलं.