Pakistan Vs India, KL Rahul : अरे संपला रे तो, आता काय खेळत नसतोय... असं नेहमी कानावर येतं. आता ही चर्चा सुरू होती ती केएल राहुल (KL Rahul) याच्यासाठी. मात्र, राहुल 4 महिन्यानंतर मैदानात आला अन् खणखणीत शतक ठोकलं, तेही पाकिस्तानविरुद्ध...  ना शाबाद खानला पाहिलं ना शाहीन शाह आफ्रिदीला.. जगातील बेस्ट बॉलिंग लाईनअपला राहुलने बारक्या पोरागत मारलंय. केएल राहुलने धमाकेदा नाबाद 111 धावांची खेळी केली. मात्र, सुरूवातीपासून हळूवार खेळणाऱ्या राहुला किक बसली ती शाबाद खानच्या ओव्हरमध्ये... याच ओव्हरमध्ये राहुलने शाबादला खणखणीत (KL Rahul Huge six) सिक्स खेचलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केएल राहुलने 60 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर पिचची मदत मिळत असल्याचं पाहून विराट (Virat Kohli) आणि राहुलने आक्रमन सुरू केलं. सामन्याची 35 वी ओव्हर सुरू होती. पावसामुळे सामना कोणत्याही दिशेला फिरणार, हे टीम इंडियाला पक्क माहित असल्याने विराटने पाकिस्तानचा खेळ खल्लास करण्याचा निर्धार केला. मात्र, जबाबदारी स्विकारली केएल राहुलने. त्याने 35 व्या ओव्हरपासून हाणामारी सुरू केली. केएल राहुलने 35 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर शादाब खान याच्या बॉलिंगवर 84 मीटर लांब कडक सिक्स ठोकला. हा सिक्स एवढा परफेक्ट होता की, नॉन स्टाईकला उभा असलेल्या विराट कोहलीला देखील आश्चर्याचा धक्का बसला. एका पायावर बॅलेन्स घेत त्याने उभ्या उभ्या शादाबच्या चिंधड्या उडवल्या. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे.


पाहा Video




दरम्यान, केएल राहुल आणि विराट कोहली दोघांनी वैयक्तिक शतक ठोकलं. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 233 धावांची नाबाद भागीदारी केली. विराट कोहली याने 94 बॉलमध्ये 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 122 धावा केल्या. तर केएल राहुल याने 106 बॉलमध्ये 12 फोर आणि 2 कडक सिक्सच्या मदतीने नॉट आऊट 111 रन्स केल्या. त्यामुळे भारताला ऐतिहासिक 356 धावांचा आकडा गाठता आला आहे.



पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (W), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रॉफ.


भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.