नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये विराट कोहलीनं आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. फिरोजशहा कोटला मैदानामध्ये झालेल्या या मॅचवेळी विराट कोहली वॉकीटॉकीवर बोलताना दिसला. आयसीच्या नियमांनुसार मॅच सुरु असताना कोणताही खेळाडू मोबाईल किंवा वॉकीटॉकी वापरू शकत नाही. असं असतानाही विराटनं मॅच सुरु असताना वॉकीटॉकी वापरल्याची दृष्यं समोर आली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीनं मात्र विराट कोहलीला क्लिन चीट दिली आहे. वॉकीटॉकी वापरण्यासाठी विराट कोहलीनं परवानगी मागितली होती, असं आयसीसीकडून सांगण्यात आलं आहे. आयसीसीनं विराटला क्लिन चिटही दिली आहे. या मुद्द्यावर लवकरच आयसीसी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळत आहे. विराट कोहली वॉकीटॉकीवर कोणाशी बोलत होता हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.