मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या मानेच्या दुखापतीने ग्रस्त आहे. आयपीएलदरम्यान त्याला दुखापत झाली होती यावेळी चेकअप करण्यात आली. त्यावेळी त्याला स्लिप डिस्क झाल्याची चर्चा होती. मात्र बीसीसीआयने यावर स्पष्टीकरण दिले होते. त्याला मानेला छोटीशी दुखापत झाली होती. त्याची पुढील फिटनेस टेस्ट १५ जूनला होणार आहे. विराटने नुकतेच आपल्या आरोग्याबाबतचे ताजे अपडेट सोशल मीडियावर दिलेत. विराटच्या दुखापतीवरुन मोठी चर्चा झाली होती. विराट इंग्लंड दौऱ्यासाठी जोरदार तयारी करत असताना विराटच्या मानेची दुखापत समोर आलीये. सुरुवातीला विराट या दौऱ्यातील काही सामन्यांना मुकणार की काय अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र लगेच बीसीसीआयने यावर स्पष्टीकरण दिले. विराटची दुखापत गंभीर नसून तो केवळ काऊंटी क्रिकेट खेळू शकणार नाही. त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी तीन आठवड्यांची गरज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटने नुकताच एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. यात त्याने फॅन्सला आपल्या दुखापतीबाबत ताजे अपडेट दिलेत. या व्हिडीओत त्याने म्हटलेय, गाईज, खूप मेहनत करतोय. रिहॅब सुरु आहे. जे बेस्ट करु शकतो आणि जे करण्याची परवानगी दिलीये ते करतोय. कठोर मेहनतीचे फळ नक्कीच मिळते. तुमचा दिवस शुभ जावो. चिअर्स...