मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयला एक नियम बदलण्याची विनंती केली आहे. मॅच दौऱ्यादरम्यान खेळाडू आणि त्यांच्या पत्नींना सोबत राहण्याची परवानगी द्यावी असं त्यानं म्हटलंय. आताच्या नियमानुसार खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या पत्नी केवळ दोन आठवडेच सोबत राहू शकतात. पण बीसीसीआयच्या एका बड्या अधिकाऱ्यासमोर विराटने आपली कैफियत मांडली आहे. 


तात्काळ निर्णय नाही  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 विनोद राय आणि डायना एडुलजी यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रीम कोर्टद्वारा नियुक्त समितीला याबद्दल सांगण्यात आलं. भारतीय टीमचे मॅनेजर सुनील सुब्रहण्यम यांना सीओएंनी या नियमात औपचारीक बदल करण्यास सांगितलंय. पण यावर तात्काळ कोणता निर्णय होणार नाहीय. इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलंय. 


औपचारीकता  गरजेची


 विराटने ही विनंती काही आठवड्यांपूर्वीच केली होती. बीसीसीआयचा हा नियम असल्यानं याची औपचारीकता पूर्ण करणं गरजेचं आहे. अनुष्का शर्मा सध्या परदेशात कोहलीसोबत यात्रा करतेयं. विराटला जुन्या नियमांत बदल करायचे आहेत. भारतीय खेळाडूंना आपल्या पत्नींना टीमसोबत प्रवास करण्याची परवानगी मिळायला हवी असं त्यानं म्हटलंय.