मुंबई: इंग्लंड विरुद्ध भारत 4 सामन्यांच्या मालिकेमध्ये दुसरा कसोटी सामना होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता भारताला पुढचे तीन सामने जिंकणं महत्त्वाचं आहे. मात्र यामध्ये जर भारतीय संघ अपयशी ठरला तर वर्ल्ड चॅम्पियनशिप ट्रॉफीसाठी होणाऱ्या अंतिम सामन्यातून भारतीय संघ बाहेर पडेल. अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी भारताला उर्वरित सामने जिंकण्याचं आव्हान आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड विरुद्ध चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यानं कर्णधार विराट कोहलीवर सध्या दबाव असल्याचंही सांगितलं जात आहे. विराट कोहलीची दुसरी समस्या अशी आहे की जर टीम इंडियाने आता मालिकेचा एक कसोटी सामना गमवला तर ती मालिका जिंकता येणार नाही. 


चेन्नई कसोटीतील पराभवानंतर विराट कोहलीला बऱ्याच टीकांचा सामना करावा लागला होता. इंग्लंडचा लेफ्ट स्पिनर मोंटी पनेसर यांनी विराट कोहलीबाबत मोठा दावा केला आहे. या दाव्यामुळे क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. जर भारतीय संघ दुसऱ्या सामन्यातही पराभूत झाला तर विराट कोहलीला कर्णधारपद सोडावच लागेल असा दावा केला आहे. 


आणखीन एक पराभव, World Test Championship भारत बाहेर?


मॉन्टी पनेसर यांनी एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा दावा केला. विराट कोहली तरबेज आणि महान फलंदाज करणारा क्रिकेटपटू आहे. पण त्याच्या नेतृत्वात संघानं चांगली कामगिरी बजावली नाही. शिवाय शेवटच्या 4 कसोटींमध्ये देखील पराभवाचा सामना करावा लागला. 


नुकत्याच झालेल्या चेन्नई कसोटीतही भारतीय संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे मला वाटतं की या सगळ्यानंतर विराट कोहलीवरचा दबाव आणखीन वाढेल. राहणेच्या नेतृत्वात संघानं चांगली कामगिरी केली होती. अजिंक रहाणे भारतीय संघाच्या कर्णधारपदी असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतानं 2-1 असा दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे आणखी एक पराभव झाला तर विराट कोहलीला त्याचं कर्णधारपद सोडावं लागले असा दावा गोलंदाजी करणारा क्रिकेटपटू मॉन्टी पनेसर याने केला आहे. 


स्पिनर यजुवेंद्र चहलच्या पत्नीचा श्रेयस अय्यरसोबत जबरदस्त डान्स


भारत विरुद्ध इंग्लंड चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताच्या हातून सुटला. ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे. उरलेले तिन्ही सामने भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. आणखीन एक पराभव भारतीय संघासाठी घातक ठरू शकतो. भारत आणखीन एका सामन्यात पराभव झाला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून बाहेर पडेल.