सीरिज संपल्यानंतरही विराटचा करिश्मा कायम, वर्षाअखेरीसही अव्वल
२०१९ या वर्षातली टीम इंडियाची अखेरची सीरिज संपली आहे.
मुंबई : २०१९ या वर्षातली टीम इंडियाची अखेरची सीरिज संपली आहे. ही सीरिज संपल्यानंतरही भारताचा कर्णधार विराट कोहलीचा करिश्मा कायम आहे. टेस्ट क्रमवारीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर कायम आहे. ९२८ गुणांसह विराट पहिल्या क्रमांकावर आहे. तर स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने एकदिवसीय जागतिक क्रमवारीसह कसोटी जागतिक क्रमवारीतही पहिला क्रमांक कायम राखलाय.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर, चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावर आणि ऑस्ट्रेलियाचा मार्कस लबुचने पाचव्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये शतकं करणारा बाबर आजम ३ स्थान वरती सहाव्या क्रमांकावर आला आहे.
बाबर आजमच्या क्रमवारीत सुधारणा झाल्याचा फटका अजिंक्य रहाणे, डेव्हिड वॉर्नर आणि जो रूटला बसला आहे. हे तिघं खेळाडू क्रमवारीत अनुक्रमे सातव्या, आठव्या आणि नवव्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. न्यूझीलंडचा रॉस टेलर या यादीत १०व्या क्रमांकावर आहे.
टेस्ट बॉलरच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर कगिसो रबाडा दुसऱ्या, निल वॅगनर तिसऱ्या, जेसन होल्डर चौथ्या आणि मिचेल स्टार्क पाचव्या क्रमांकावर आहे. भारताचा जसप्रीत बुमराह सहाव्या क्रमांकावर आहे. ऑगस्ट महिन्यात बुमराह शेवटची टेस्ट खेळला होता.
वनडे क्रिकेटमध्येही विराट कोहली २०१९ हे वर्ष पहिल्या क्रमांकावर आणि रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर संपवणार आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्ये केलेल्या रनचा फायदा केएल राहुल आणि श्रेयस अय्यरलाही झाला आहे.
सीरिजमध्ये १८५ रन करणारा केएल राहुल १७ स्थानं वरती ७१व्या क्रमांकावर आणि १३० रन करणारा श्रेयस अय्यर १०४व्या क्रमांकावरून ८१व्या क्रमांकावर आला आहे. वेस्ट इंडिजचा शाय होप टॉप-१० मध्ये आला आहे. शाय होप नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे.