IPL 2023 : पूर्ण फी कापायला नको....; गंभीरसोबतच्या वादानंतर विराटचं BCCI पत्र
Virat Kohli : 1 मे रोजी लखनऊ सुपर जाएंट्स ( Lucknow Super Giants ) विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू ( Royal Challengers Bangalore ) यांच्यात सामना झाला. या सामन्यानंतर विराटने बीसीसीआयला पत्र लिहिलंय.
Virat Kohli : विराट कोहली ( Virat Kohli ) आणि गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) यांच्यातील वाद लखनऊ सुपर जाएंट्स ( Lucknow Super Giants ) विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू ( Royal Challengers Bangalore ) यांच्या सामन्यानंतर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. दरम्यान या वादामुळे खेळाडूंना दंड देखील लागला. 1 मे रोजी लखनऊ विरूद्ध बंगळूरू सामन्यात विराट कोहलीचा ( Virat Kohli ) रूद्र अवतार पहायला मिळाला. यावेळी गंभीर सोबत झालेल्या वादानंतर कोहलीने BCCI ला मेल लिहिला आहे.
1 मे रोजी झालेल्या सामन्यानंतर बीसीसीआयने ( BCCI ) गौतम गंभीर, विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यावर कारवाई करत त्यांना दंड ठोठावला. यावेळी गौतम गंभीर आणि विराट कोहली यांची सामन्याच्या 100 टक्के फी कापण्यात आली. तर नवीन-उल-हकचे 50 टक्के फीस कापण्यात आलीये.
वादानंतर कोहलीने BCCI ला लिहिला मेल
100 टक्के सामन्यांची फी कापल्यानंतर विराटला जवळपाल 1 कोटी 7 लाखांचा फरक पडला. यानंतर त्याने याविषयी बीसीसीआयला एक मेल लिहिलाय.
बीसीसीआयला लिहिलेल्या या मेलमध्ये विराटने म्हटलं की, त्यादिवशी नवीन-उल-हक आणि गौतम गंभीर यांच्याशी जेव्हा वाद झाला त्यावेळी त्या दोघांना काहीही वाईट बोललो नाही. त्यामुळे माझी पूर्ण सामन्याची फी कापायला नको होती. इतकंच नाही तर नवीन-उल-हक बाबत त्याने तक्रार केली आहे.
2013 मध्येही गंभीर-विराट भिडले होते
गंभीर आणि विराटचा हा वाद पाहून सर्व चाहत्यांना 2013 ची आठवण झाली. यावेळी देखील गौतम गंभीर आणि विराट कोहली एकमेंकाशी भिडले होते. तेव्हा गौतम गंभीर कोलकाता नाईड रायडर्सचा कर्णधार होता. त्यावेळी विराट कोहली आऊट झाल्यानंतर गंभीरसोबत त्याचा वाद झालेला. त्यानंतर आता पुन्हा 10 वर्षानंतर या दोन्ही दिग्गज खेळाडूंमध्ये वादाची ठिणगी पडली. या दोघांनाही या वादाचा भुर्दंड भरावा लागला.
बीसीसीआयने कोहली आणि गंभीर यांना या घटनेबाबत दोषी ठरवून ठरलं. या दोघांना प्रत्येक मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला. विराटला 1 कोटींचा दंडाची शिक्षा देण्यात आली असली तरी, त्याचं एता रुपयांचंही नुकसान होणार नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, जर एखाद्या खेळाडूवर दंड ठोठवण्यात आला तर ती रक्कम फ्रेंचायझींमार्फत भरली जाते. शिवा. फ्रेंचायझी ही रक्कम खेळाडूच्या पगारातून कापत नाही.