कर्णधारपद सोडल्यानंतर भावूक कोहली विडा उचलत म्हणाला...
भारतीय संघाचा T20 वर्ल्डकपमधील प्रवास संपला आहे. यासोबतच एक मोठा अध्यायही संपला असून विराट कोहली यापुढे टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार नाही. नामिबियाविरुद्धचा सामना संपल्यानंतर विराट कोहलीने कर्णधार म्हणून आपला प्रवास आणि टी-20 वर्ल्डकपमधील भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल सांगितलं.
दुबई : भारतीय संघाचा T20 वर्ल्डकपमधील प्रवास संपला आहे. यासोबतच एक मोठा अध्यायही संपला असून विराट कोहली यापुढे टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार नाही. नामिबियाविरुद्धचा सामना संपल्यानंतर विराट कोहलीने कर्णधार म्हणून आपला प्रवास आणि टी-20 वर्ल्डकपमधील भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल सांगितलं.
T20चं कर्णधारपद सोडल्यानंतर त्याला कसं वाटतं या प्रश्नावर विराट कोहली म्हणाला, 'सर्वप्रथम आराम वाटत आहे. माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे पण आपण सर्व काही योग्य दिशेने जाताना पाहिले पाहिजे. वर्कलोड मॅनेज करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ होती."
फिल्डवर त्याच जोशात उतरणार का या प्रश्नावर उत्तर देताना विराट कोहली म्हणाला, "'फिल्डवरील जोश कधीच बदलणार नाही. मी तसं करू शकलो नाही तर मी त्यापुढे खेळणार नाही. मी कर्णधार नसतानाही पूर्ण जोमाने खेळात असायचो. मी फक्त उभे राहून काहीही करू शकणार नाही."
विराट कोहली पुढे म्हणाला, 'एक संघ म्हणून आम्ही शानदार खेळ दाखवला आहे. या वर्ल्डकपमध्ये आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही. पण टी-20 मध्ये आम्ही चांगले निकाल दिले आहेत."
विराट कोहलीने तो नामिबियाविरुद्ध फलंदाजीसाठी का आला नाही हेही सांगितले. विराट कोहली म्हणाला की, "सूर्यकुमार यादवला या स्पर्धेत फारशी फलंदाजी मिळाली नाही. अशा स्थितीत त्याने क्रीजवर जावं हेच बरं होतं."